Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडचा नवा रेकॉर्ड; टाकलं विराट कोहलीला मागं

Ruturaj Gaikwad | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS )  दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होती. या मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या मैदानावर झाला.

भारतीय संघाने ही मालिका आपल्या नावावर केली आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

त्याने ( Ruturaj Gaikwad ) या सामन्यांमध्ये 71 च्या सरासरीने 213 धावा केल्या. यानंतर त्याच्या ( Ruturaj Gaikwad ) नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad ) विराट कोहलीला ( Virat Kohli ) मागे टाकलं आहे.

Ruturaj Gaikwad registered a new record in the T20 series

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad ) नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.

त्याच्या ( Ruturaj Gaikwad ) नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोणत्याही द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे.

याआधी विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम होता. विराटच्या नावावर 199 धावा होत्या. यानंतर ऋतुराजने ( Ruturaj Gaikwad ) कोहलीला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

दरम्यान, क्रिकेट चाहते आयपीएल 2024 ची आतुरतेने वाट बघत आहे. 19 डिसेंबर 2023 ला दुबईमध्ये आयपीएलचा लिलाव होणार आहे.

तत्पूर्वी खेळाडूंना 30 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी होती. आयपीएल 2024 लिलावासाठी 1166 खेळाडूंची नावं नोंदवण्यात आली आहे.

यामध्ये 830 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे तर 336 परदेशी खेळाडू सामील झाले आहे. यामध्ये 212 कॅप्ड, 909 अनकॅप्ड आणि 45 सहयोगी देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 830 भारतीय खेळाडूंपैकी 18 खेळाडू कॅप्ड आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.