Trekking Tips | महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत आहात? तर ‘ही’ ठिकाण ठरू शकतात उत्तम पर्याय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Trekking Tips | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राला सुंदर सह्याद्री पर्वतरांग लाभली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे.

अशात तुम्ही पण जर सह्याद्री पर्वतरांगेत ट्रेकिंगला ( Trekking Tips ) जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सह्याद्री पर्वत रांगेतील काही आकर्षक आणि सोप्या ट्रेकिंग ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.

तुम्ही जर ट्रेकिंगला  ( Trekking Tips ) जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट देऊ शकतात.

हरिश्चंद्रगड किल्ला ( Harishchandragarh Fort-Trekking Tips )

हरिश्चंद्रगड हा किल्ला ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटाच्या डावीकडे उभा आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 1424 मीटर उंचीवर आहे.

या गडावर ट्रेकिंगला जाण्यासाठी तीन वाटा प्रचलित आहे. यामध्ये पाचनई वाट, खिरेश्वर वाट आणि नळीची वाट यांचा समावेश आहे. खिरेश्वर आणि नळीची वाट थोडीशी अवघड आहे.

त्यामुळे तुम्ही जर हरिश्चंद्रगडला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पाचनई वाट या मार्गाने या किल्ल्याकडे जाऊ शकतात.

या किल्ल्यावरील छोट्या छोट्या लेण्या, महादेवाचे मंदिर, कोकणकडा इत्यादी गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे तुम्ही जर ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल तर हरिश्चंद्रगड तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

लोहगड किल्ला  ( Lohgad Fort-Trekking Tips )

लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ स्थित आहे. लोहगड किल्ल्यावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते.

त्याचबरोबर या किल्ल्यावरून तिकोना आणि तुंग किल्ल्याचे देखील दर्शन होते. या किल्ल्यावर तुम्हाला विंचू कडा, जुन्या पाण्याच्या टाक्या, इत्यादी गोष्टी बघायला मिळतील.

जीवधन किल्ला  ( Jivdhan Fort-Trekking Tips )

तुम्ही जर ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल तर जीवधन किल्ला तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. पुणे जिल्ह्यात स्थित असलेला हा किल्ला नाणेघाटापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

या किल्ल्यावर तुम्हाला पाण्याच्या टाक्या, धान्य कोठार, वानरलिंगी सुळका इत्यादी गोष्टी बघायला मिळतील. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला अत्यंत शांत आणि सुंदर आहे. या किल्ल्यावरून तुम्हाला सह्याद्रीचे सर्वोत्तम नजरे अनुभवायला मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या