Raj Thackeray | थातूर-मातूर कारवाई करण्यापेक्षा इंग्रजी पाट्यांवर बुलडोझर चालवा; मनसे नेत्याचा इशारा

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.  सुप्रीम कोर्टाने दुकानांवर आणि आस्थापनांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा आदेश दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अनेक दुकान आणि आस्थापनांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यात आलेल्या नाही. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Raj Thackeray ) आंदोलन करताना दिसत आहे. मराठी भाषेत पाट्या लावल्या नाही तर आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( Raj Thackeray ) दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. थातूर-मातूर कारवाई करण्यापेक्षा इंग्रजी पाट्यांवर बुलडोझर चालवा, असं संदीप देशपांडे यांनी म्हटल आहे.

Bulldozer can also run in Maharashtra – Sandeep Deshpande

संदीप देशपांडे म्हणाले, “मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर फाईन मारणं म्हणजे कारवाई नाही. थातूर-मातूर कारवाई करण्यापेक्षा इंग्रजी पाट्यांवर बुलडोझर चालवा. बुलडोझर फक्त उत्तर प्रदेशमध्ये चाललं पाहिजे, असं काही नाही. महाराष्ट्रामध्ये देखील बुलडोझर चालू शकतो.”

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची भेट घेतली आहे.

दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाबाबत अंमलबजावणी आणि दंडत्मक कारवाई करण्याबाबत त्यांच्या या बैठकीत चर्चा झाली आहे.

तर दुसरीकडे मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे ( Raj Thackeray ) कार्यकर्त्यांनी पुणे आणि नाशिक शहरात आंदोलन केलं आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी ( Raj Thackeray ) पुण्यामध्ये इंग्रजी पाट्या फोडल्या आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी ( Raj Thackeray ) इंग्रजी पाट्यांना काळ फासलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.