Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचे पोट दुखायला लागल्याने त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याच्यावर सेमी आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
अशातच आता वाल्मिक कराडबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयात कैद्यांसाठीचे प्रोटोकॉल डावलून कशाप्रकारे विशेष वागणूक दिल्याचा तपशील समोर आला आहे. वाल्मिक कराडला उपचारासाठी दाखल केलेल्या बीड जिल्हा रुग्णालयात पहिल्या मजल्यावर स्वतंत्र कोठडी आहे.
याच कोठडीत चार बेड आहेत. पण कराडला या कोठडीत न ठेवता त्याला मिनी आयसीयू असलेल्या चकाचक सर्जिकल वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. विशेष म्हणजे त्याला या वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवले होते.
Walmik Karad in beed hospital
याच वॉर्डमध्ये एकूण 24 बेड असून कराडच्या एका बाजूचे 11 बेड रिकामे ठेवले होते. जरी सुरक्षेचे कारण पुढे करत वाल्मिक कराडला सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवले असले तरी आता रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :