Share

बीडमध्ये घडामोडींना वेग! Walmik Karad च्या कार्यालयाची सूत्रे Dhananjay Munde यांच्या बंधूच्या हाती, नेमकं प्रकरण काय?

The Jagamitra office of Walmik Karad has been handed over to Dhananjay Munde brother Ajay Munde.

by MHD

Published On: 

Jagamitra office of Walmik Karad to Dhananjay Munde brother Ajay Munde

🕒 1 min read

Walmik Karad । एकीकडे मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी वाल्मिक कराडविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.

अशातच बीडमध्ये घडामोडींना वेग आला आहे. परळीतील जगमित्र या कार्यालयातून वाल्मिक कराड नागरिकांचे प्रश्न सोडवत होता. परंतु, कराडला अटक केल्याने या कार्यालयाचे कामकाज कोण पाहणार? असा सवाल उपस्थित केला जात होता.

अखेर आता याच कार्यालयाची सूत्रे धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. दरम्यान, अजय मुंडे (Ajay Munde) हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडे गटनेते पद देखील आहे. ते धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीत मतदारसंघाची कामे पाहत असत.

Jagamitra office sources to Ajay Munde

दरम्यान, वाल्मिक कराडची सर्व संपत्ती एसआयटीने जप्त करण्याची तयारी सुरु केली असून त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज देखील दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित केला आहे. याआधी सीआयडीने कराडची संपत्ती परदेशात असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच आता एसआयटीने कराडच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)