Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरातून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. अशातच आता या हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. एसआयटी (SIT) कडून कोर्टात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे.
वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत (Macoca to Walmik Karad) कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यामध्ये आरोपीची संपत्ती जप्त करण्याची तरतूद आहे. याच प्रकरणी आज एसआयटीने मकोका कोर्टामध्ये वाल्मिक कराडची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली आहे. (Walmik Karad Property)
त्यामुळे वाल्मिक कराडची संपत्ती गोठवली जाऊन ती जप्त केली जाऊ शकते. परंतु, वाल्मिक कराड याच्या कुटुंबीयांची संपत्ती जप्त होणार का? असे सवाल सध्या उपस्थित केले जात आहेत. कारण वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिली आणि दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.
Walmik Karad Family Property
इतकेच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यावर आता कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दिवसेंदिवस वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जात आहे. याप्रकरणी आणखी किती खुलासे होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :