Balaji Tandle । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सध्या असाच एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. यामुळे या हत्याप्रकरणाला वेगळे वळण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडने खंडणी मागितली त्या दिवशीचे CCTV फुटेज समोर आले होते. अशातच आता पुन्हा एकदा एक नवीन CCTV फुटेज समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे फुटेज वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा सहकारी आणि माजी सरपंच बालाजी तांदळे याचे आहे.
याच बालाजी तांदळेने सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून धमकावल्याची तक्रार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केली होती. तसेच त्याने आरोपी विष्णू चाटे याला पाण्याच्या बॉटल्स न्यायालयात दिले असल्याचे देखील समोर आले होते. अशातच आता याच बालाजी तांदळेचा नवा कारनामा समोर आला आहे.
Balaji Tandle CCTV Footage
सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे आणि महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवले होते त्यादरम्यान त्यांना लागणारे साहित्य बालाजी तांदळेने एका दुकानातून खरेदी केले असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामुळे आता पोलीस त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार का? जर तो या प्रकरणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :