Sanjay Raut । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणाने राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच पेटले आहे. विरोधक याच मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.
“वाल्मिकी कराड (Walmik Karad) तात्पुरता झाला असेल उद्या हा त्यांच्याच पक्षातील माणूस आहे. यापूर्वी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची संपत्ती जप्त झाली होती. कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली, याची संपूर्ण यादीच आहे. उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराड परत हा परत संत होणार. भाजप (BJP) हा त्याला संत पदाचा दर्जा देऊन महामंडलेश्वर करणार,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut on Walmik Karad
पुढे ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लाचार असून हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या बाजूने आहे. ठाण्याच्या मंत्र्यांचे काय चालू आहे? आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकारवर नियंत्रण नाही,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना केला आहे. यावरून पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप कशाप्रकारे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :