Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांचा मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच पेटले आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही आवाज उठवला आहे.
त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर वक्तव्य केले आहे (Anjali Damania on Dhananjay Munde). “व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस या कंपनीत धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडही आहेत. व्यंकटेश्वरा आणि टर्टर लॉजिस्टिक नावाची आणखी एक कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेनकोकडून मिळत आहे. बॅलन्स शीटमध्ये फ्लाय अँश सेल दाखवल असून त्यावर धनंजय मुंडे यांची सही आहे. सुप्रीम कोर्टचे रुलिंग आहेत की एक रुपया जरी मिळाला तरी, त्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं आणि याच मुद्यावरून मुंडेंचे मंत्रीपद आणि आमदारकीसुद्धा रद्द झाली पाहिजे,” अशी मागणी दमानिया यांनी केली.
दरम्यान, वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे याचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आमदारकीची आणि मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. विरोधकही सातत्याने त्यांचा राजीनामा मागत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Anjali Damania vs Dhananjay Munde
विशेष म्हणजे आमदारकी आणि मंत्रीपदाला इतका विरोध होऊनही धनंजय मुंडे यांनी अजूनही राजीनामा का दिला नाही? असा सवाल विचारला जात आहे. तसेच उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्यावरही भाजपकडून राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे राजीनामा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :