Buttermilk With Curry Leaves | उन्हाळ्यामध्ये ताकात कढीपत्ता मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Buttermilk With Curry Leaves | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या गरम वातावरणात ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. ताकामध्ये विटामिन ए, विटामिन बी, कॅलरीज, प्रोटीन आणि फॅट भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. ताकासोबत कढीपत्त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या दोन्हीमध्ये आढळणारे घटक उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये ताकात कढीपत्ता मिसळून प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते (Increases immunity-Buttermilk With Curry Leaves Benefits)

कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे रोगपतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये ताकात कढीपत्ता मिसळून प्यायल्याने तुम्ही सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. उन्हाळ्यामध्ये कढीपत्त्याच्या ताकाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Buttermilk With Curry Leaves Benefits)

ताकामध्ये फॅट आणि कॅलरीज खूप कमी प्रमाणात आढळून येते, जे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये महानिम्बाइन नावाचा अल्कलॉइड आढळून येते, जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी ठरते. उन्हाळ्यामध्ये कढीपत्ता आणि ताक प्यायल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

शरीर डिटॉक्स होते (The body is detoxified-Buttermilk With Curry Leaves Benefits)

ताक आणि कढीपत्त्याचे एकत्र सेवन केल्याने शरीरात साठलेले विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही नियमित कढीपत्ता आणि ताकाचे सेवन करू शकतात. कढीपत्त्याच्या ताकाचे सेवन केल्याने मेटाबॉलिझम वाढते आणि पचनाच्या अनेक समस्या दूर होतात.

उन्हाळ्यामध्ये ताकासोबत कढीपत्त्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

ग्रीन टी (Green Tea For Detoxification)

ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्याचबरोबर नियमित ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ग्रीन टीचे सेवन करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

लिंबू (Lemon For Detoxification)

लिंबामध्ये आढळणारे विटामिन सी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर लिंबामध्ये फायबर, सोडियम, पोटॅशियम, आयरन घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. लिंबाचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि शरीर डिटॉक्स होते. याच्या सेवनाने तुम्ही अपचन, गॅस इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button