Share

Jalyukta Shivar | महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! तर जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी!

Jalyukta Shivar | मुंबई : नुकतीच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल आज जाहीर केला आहे . तर त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विट करता दिली आहे. त्याचंप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन देखील केले आहे.

तसचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटलं आहे की, जलयुक्त शिवार (Jalyukta Shiwar), गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्यामुळे हे यश महाराष्ट्राला मिळालं आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे जास्त असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर २०१८-१९ या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत. असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, जलयुक्त शिवार आणि जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक अभिनंदन देखील केलं आहे. याचप्रमाणे आता जलयुक्त शिवार २ अभियान सुद्धा याच पद्धतीनं सर्वांनी यशस्वी करावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जनतेला केलं आहे. तर या योजनांना विरोध देखील होत असल्याचा पाहायला मिळतं आहे. परंतु जलयुक्त शिवाय या योजनेमुळे अनेक जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न कमी झाला असल्याचं देखील पहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

Jalyukta Shivar | मुंबई : नुकतीच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला …

पुढे वाचा

India Maharashtra Mumbai Nashik Politics Pune

Join WhatsApp

Join Now