Sanjay Raut । श्रीकांत एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का? नसेल तर सिद्ध करा – संजय राऊत

Sanjay Raut Slams Eknath Shinde, Shrikant Shinde Over CMs Statement

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut । शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्यांनी निकालात शिवसेना ही शिंदे यांची असल्याचे निकालात सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालाचं स्वागत करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, “या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे”, असे शिंदे म्हणाले होते.

या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. श्रीकांत शिंदे तुमचा (एकनाथ शिंदे ) मुलगा नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut Comment On CM Eknath Shinde, Shrikant Shinde

पुढे राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाल्याचं म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का?, सिद्ध करा नाही म्हणून, श्रीकांत शिंदेंसाठी मुलगा म्हणूनच मत मागितलं ना.” “बाळासाहेब ठाकरे यांची घराणेशाही कधीच नव्हती. शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती, यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती.

विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. शिवसेनेला इतिहासात जमा करणारे स्वतः गाडले गेले” असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या