Prakash Ambedkar : खरा निकाल लागलाच नाही, उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती – प्रकाश आंबडेकर

Prakash Ambedkar reaction on MLA Disqualification Case

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) खरा निकाल लागलाच नसून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्यांनी निकालात शिवसेना ही शिंदे यांची असल्याचे निकालात सांगितले. त्यावर प्रकाश आंबडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Prakash Ambedkar Reaction on MLA Disqualification Case

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह दिले, त्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाची हार झाली होती. फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या