Rohit Sharma | रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

Ind Vs Eng । Bad news for Rohit Sharma fans; Mohammed Shami Miss test match Against England Due To Injury

Rohit Sharma | अफगाणिस्ताविरूद्धच्या T20I मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणी केली आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Rohit Sharma And Virat Kohli ) यांनी T20I  कमबॅक केले आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या T20I मालिकेसाठी रोहितला कर्णधार बनवण्यात आले आहे.

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी हि आनंदाची बातमी असतानाच दुसरी वाईट बातमी समोर आली आहे. 11 ते 17 जानेवारी दरम्यान अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे.

Bad news for Rohit Sharma fans

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) टेन्शन वाढलंय. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा इंग्लंड विरुद्धच्या ( IND vs ENG ) पहिल्या 2 कसोटी सामन्यांना नसणार आहे.

मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नसल्याने तो इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी नसल्याने टीम इंडियासाठी मोठा झटका असेल. ( Mohammed Shami Miss test match Against England Due To Injury )

IND vs ENG Test 2024 Schedule

पहिला सामना, 25 ते 29 जानेवारी, हैदराबाद.

दुसरा सामना, 2 ते 6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम.

तिसरा सामना, 15 ते 19 फेब्रुवारी, राजकोट.

चौथा सामना, 23 ते 27 फेब्रुवारी, रांची

पाचवा सामना, 7 ते 11 मार्च, धर्मशाला.

When will the IND vs ENG Test series take place?

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका 25 जानेवारी ते 11 मार्च 2024 दरम्यान होणार आहे. पहिली कसोटी 25 जानेवारीपासून सुरू होईल. 5वी कसोटी 7 मार्चपासून सुरू होईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचही कसोटी सामने भारतात खेळवले जाणार आहेत. सर्व खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होतील.

When and Where to watch the IND vs ENG Test series on television?

IND vs ENG कसोटी सामने टीव्ही वर तुम्ही Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता.

Live streaming IND vs ENG Test series

भारत विरुद्ध इंग्लंड लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात जिओ सिनेमा अॅप वर तुम्ही पाहू शकाल.

IND vs ENG Test series Squad

India Squad:  अजून घोषणा नाही

England Squad: बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, रेहान अहमद, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, ऑली पोप, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन , मार्क वुड.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.