IND vs AFG 1st T20I | भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20I कोण जिंकणार?

India vs Afghanistan 1st T20 match: When, where and how to watch, live streaming details

IND vs AFG | मोहाली | अफगाणिस्तान विरुद्ध T20I तीन सामन्यांच्या मालिकेला आज सुरवात होणार आहे. आज पहिला सामना मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20i सामना संद्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

या मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Rohit Sharma And Virat Kohli ) यांनी T20I  कमबॅक केले होते.  परंतु विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नाही. मात्र तो उर्वरित मालिकेसाठी खेळणार असल्याचे टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी सांगितले.

भारतीय संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल,  तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान संघ | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

India Vs Afghanistan: Win prediction

नाणेफेक कोणीही जिंकले तरी भारत सामना जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची ६० टक्के शक्यता आहे, परंतु अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची टक्केवारी ७० वर जाईल.

India Vs Afghanistan: Pitch report

पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करावी.

India Vs Afghanistan: Weather report

पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियममधील हवामान सुमारे 10-11 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. 33 टक्के आर्द्रतेसह आकाश निरभ्र राहील.

India vs Afghanistan tour schedule

1st T20I – गुरुवार, 11 जानेवारी 2024 , मोहाली

2nd T20I – रविवार , 14 जानेवारी 2024, इंदूर

3rd T20I – बुधवार, 17 जानेवारी  2024, बेंगळुरू

वेळ – भारत विरुद्ध अफगाणिस्तान सर्व T20I सामने  संद्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहेत.

IND VS AFG T20I Match Where To Watch On TV?

IND Vs AFG T20 Series टीव्ही वर तुम्ही Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता.

IND VS AFG T20I Match Live Streaming Details

IND Vs AFG T20 Series तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅपवर Live Streaming पाहू शकता.

India Vs Afghanistan T20I Match Timings

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.