Sharad Pawar | ‘लवकरच मुख्यमंत्री बदलणार’ संजय राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Sharad Pawar | मुंबई : महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री लवकरच बदलणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे अनेक शहरात मनातील मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकताना दिसत आहेत . तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार असल्याचं म्हटलं होत त्यावर आणि झलकणाऱ्या पोस्टर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याचप्रमाणे शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची देखील कोकण रिफायनरी प्रकल्पनाबाबत भेट झाली याबाबद्दल देखील भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार (What did Sharad Pawar say)

गेल्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत मोठे वक्तव्य केल होत याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “मला काहीच माहीत नाही. मुख्यमंत्री बदलाचा निकाल सांगण्याचं सध्या कारण नाही. असं काही घडल्याचं माझ्या ऐकिवात नाही. राऊत यांचे विधान हे असलं बतरी ते पत्रकार आहेत, तुम्ही पत्रकारांना चांगले माहीत असते” अशा शब्दात त्यांनी या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे. तसचं पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हापासून ते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या समर्थकांनी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईत अनेक पोस्टर्स लावले. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर देत म्हटलं की, असा वेडेपणा करू नका, असं स्वतः अजित पवारांनीच भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरवरून स्पष्ट केलं आहे. शिवाय पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असावा याबाबत काही प्रस्ताव आला आहे का? असा सवालही पत्रकारांनी केला. यावर शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

दरम्यान, शरद पवार यांनी उदय सामंत यांच्या भेटीबाबत विचारल असता म्हटलं आहे की, सध्या कोकणात रिफायनरी प्रकरण जास्तच चिंगळलं आहे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, लवकरात लवकर स्थानिक लोकांची, सर्वपक्षीय बैठक घ्यावी. स्थानिकांचे प्रश्न सरकारने समजून घ्यावेत. त्यावर तोडगा काढावा. चर्चेतून तोडगा निघाला नाही तर या चर्चेत जे मुद्दे आले त्यावरून आपण काही पर्याय काढू. असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button