Karnataka Election 2023 | “राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ आधीच बंद पडलंय” : स्मृती इराणी

Smriti Irani | बेळगांव : अवघ्या दोन आठवड्यावर कर्नाटक विधानसभा निवडणूक येऊन टेकली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) चांगली कंबर कसली आहे. तर काल (25 एप्रिल ) व्हीएसएम हायस्कूलच्या मैदानावर भाजप उमेदवार मंत्री जोल्ले यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) देखील उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे.

NCP च ‘घड्याळ’ आधीच बंद पडलंय : स्मृती इराणी (NCP’s ‘clock’ has already stopped: Smriti Irani)

मेळाव्यादरम्यान, स्मृती इराणी म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) घड्याळ आधीच बंद पडलं आहे; तर गरीब, दलित, शोषितांबद्दल कळवळा व्यक्त करणाऱ्या काँग्रेसचा ढोंगीपणा अनेक मुद्द्यांवर उघडकीस आल्याने त्यांचा करिष्मा चालणार नाही. तसचं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारची कामगिरी देशात चमत्कारिक ठरली असून, विकासकामांत कायम अग्रेसर ठरलेल्या मंत्री शशिकला जोल्ले (Shashikala Jolle) यांचा विजय नक्की होणार आहे. असं देखील स्मृती इराणी म्हणाल्या.

पुढे बोलताना स्मृती इराणी यांनी शरद पवारांना टोला लगावत म्हटलं की, घड्याळ बंद पडल्याने राष्ट्रवादीतील लोक पक्षातून बाहेर पडत आहेत, यामुळं राष्ट्रवादीनं आधी आपलं घर सांभाळावं. तर कर्नाटकात लिंगायत व इतर समाजाला आरक्षण दिल्यानं काँग्रेसला इतकी पोटतिडीक कशासाठी? असा सवाल देखील त्यांनी केला. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, अजित गोपचडे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, वृषभ जैन, शांभवी अश्वतपूर, भारती मगदूम, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, प्रणव मानवी, पवन पाटील आदी उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे कोणती पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.