Mango Leaf | उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Leaf | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. कारण या गरम वातावरणामध्ये आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीराची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये तुम्ही निरोगी राहण्यासाठी आंब्याच्या पानांची मदत घेऊ शकतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए, विटामिन बी, अँटिऑक्सिडंट, बीटा केरोटीन इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन ते तीन आंब्याची पाने आणि कुटलेले आले पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. सकाळी रिकाम्या पोटी तुम्हाला या पाण्याचे सेवन करावे लागेल. या मिश्रणाचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Mango Leaf Benefits)

उन्हाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कारण या गरम वातावरणात सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादि समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आंब्याच्या पानाच्या चहाचे सेवन करू शकतात. याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही कमी आजारी पडतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर (Beneficial for skin and hair-Mango Leaf Benefits)

आंब्याच्या पानांचा चहा प्यायल्याने केस आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. याचे नियमित सेवन केल्याने त्वचेवरील पिंपल्स, एलर्जी, जळजळ इत्यादी समस्या दूर होतात. त्याचबरोबर नियमित हे पेय प्यायल्याने केसांच्या अनेक समस्या सहज दूर होतात.

पचनक्रिया सुधारते (Improves digestion-Mango Leaf Benefits)

जेवणानंतर तीस मिनिटांनी आंब्याच्या पानांचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हा चहा प्यायल्याने तुम्ही अपचन, ऍसिडिटी, बद्धकोष्टता, गॅस इत्यादी पचनाच्या समस्यांपासून दूर राहू शकतात. त्यामुळे पोटाची काळजी घेण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानाच्या चहाचे सेवन करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही खालील नैसर्गिक प्रमाणात वापरू शकतात.

गुलाब जल (Rose Water-Natural Toner for Face)

गुलाब जल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज गुलाब जलचा वापर केल्याने काळे, डाग पिगमेंटेशन इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. गुलाब जलचा टोनर म्हणून वापर करण्यासाठी तुम्हाला एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाब जलमध्ये काही थेंब ग्लिसरीनचे मिसळून घ्यावे लागेल. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करावे लागेल. दिवसातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने चेहरा चमकदार आणि मऊ होऊ शकतो.

कोरफड (Aloevera-Natural Toner for Face)

उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीचे टोनर बनवू शकतात. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. या मिश्रणामध्ये तुम्हाला चार ते पाच टी ट्री ऑइल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे लागेल. दिवसातून दोन ते चार वेळा या मिश्रणाचा चेहऱ्यावर स्प्रे केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.