WhatsApp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया (Social media) वर सक्रिय असतो. यामध्ये व्हाट्सअप हे वापरकर्त्यांचे आवडीचे सोशल मीडिया एप्लीकेशन आहे. त्यामुळे व्हाट्सअप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट घेऊन येत असते. व्हाट्सअपने सध्या नवीन अपडेट लाँच केला आहे. यामध्ये वापरकर्ते आता एकाच वेळी चार फोनमध्ये व्हाट्सअप वापरू शकतात. मार्क झुकरबर्गनं यांनी फेसबुक पोस्टद्वारे या नवीन फिचरची घोषणा केली आहे.

मार्क झुकरबर्गनं यांनी नवीन फिचरची घोषणा करत लिहिले आहे की,”आजपासून तुम्ही एकच व्हाट्सअप अकाउंट चार फोनमध्ये लॉगिन करू शकतात.” व्हाट्सअपच्या या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांचा डिव्हाइस बदलण्याचा त्रास संपणार आहे. मात्र, आजच्या काळात प्रत्येकाला आपली प्रायव्हसी हवी असताना व्हाट्सअपचे हे नवीन फिचर लाँच करण्यात आले आहे. झुकरबर्गनं यांनी शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर वापरकर्त्यांनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

व्हाट्सअपचे हे नवीन फीचर कसे वापरायचे? (How to use this new feature of WhatsApp?)

मार्क झुकरबर्गनंने जाहीर केलेल्या नवीन फिचरनुसार तुम्ही आता चार फोनमध्ये व्हाट्सअप वापरू शकतात. यासाठी तुम्हाला खालील पद्धती फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअप सुरू करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला More Options पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • समोर आलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला Link Device हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा फोन अनलॉक करून QR कोड स्कॅन करून घ्यावा लागेल.
  • QR कोड स्कॅन झाल्यानंतर तुमचे व्हाट्सअप दुसऱ्या फोनमध्ये सुरू होईल.

व्हाट्सअप अपडेट केल्यानंतर तुम्हाला जर हे फिचर दिसत नसेल, तर तुम्ही व्हाट्सअप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करू शकतात. व्हाट्सअप पुन्हा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हा ऑप्शन दिसेल.

महत्वाच्या बातम्या