Share

Bank Job | ‘या’ बँकेमार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सांगोला अर्बन बँक (Sangola Urban Bank) यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सांगोला अर्बन बँक (Sangola Urban Bank) यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सांगोला अर्बन बँक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Bank Job) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वसुली अधिकारी पदाची प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Bank Job) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Bank Job) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 29 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर खालील पत्त्यावर  उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सि. स. नं. 2924/5, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, जि. सोलापूर -413307

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

career@sangolaurbanbank.com

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.sangolaurbanbank.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही