Arvind Kejriwal | भाजपचा अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप ; तर केजरीवालांनी बंगल्याच्या नूतनीकरणावर केले इतके कोटी रुपये खर्च!

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी आप चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांना सीबीआय (CBI ) कडून चौकशी करण्यात आली होती. तसचं त्याआधी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodia ) यांना देखील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. त्यानंतर सीबीआयने केजरीवाल यांना चौकशी साठी बोलवलं होते. तर आता भाजपने केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला आहे. तसचं भाजपने उपस्थित केलेल्या ताज्या मुद्द्यात काँग्रेसही सामील झाली आहे. यामुळे केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे प्रकरण (What is the matter)

अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्यावरून सध्या वाद सुरू आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘आप’च्या (AAP) राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी एलजी सक्सेना यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांचे घर घेण्याची विनंती केली आहे. तर प्रियांका कक्कड यांनी मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना आम आदमी पक्षाचे संयोजकांचे घर ताब्यात घ्यावे आणि आपले घर मुख्यमंत्र्यांना देऊन वाद संपवावा, अशी मागणी केली आहे. तर त्यांच्या या मागणीवर भाजपने हल्लाबोल करत आरोप केले आहेत. यामध्ये भाजपने पत्रकार परिषद घेतली. भाजपचे नेते रामवीर सिंह बिधूडी म्हणाले की, हे तेच केजरीवाल आहेत जे म्हणत होते की जर सरकार आलं तर ते दोन खोल्यांच्या घरात राहतील. त्यांच्यासोबत सिक्युरिटी देऊ नका. परंतू आता त्यांच्या या घराच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याला राजवाड्याचं स्वरूप दिलं आहे. आज ते घरातून निघताना २८ वाहनांचा ताफा धावतो. त्याच्याकडे 45 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीची कार आहे.असा आरोप करत प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

दरम्यान, भाजपने केजरीवाल यांच्यावर केलेल्या या आरोपाच समर्थ करत काँग्रेस नेते अजय माकन यांनी केजरीवाल यांना आठवण करून दिली की, २०१३ मध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लाल दिवा गाडी, अतिरिक्त सुरक्षा आणि अधिकृत बंगला न वापरण्याची शपथ घेतली होती. परंतु, केजरीवाल यांनी बंगल्यासाठी डायर पॉलिश केलेले व्हिएतनाम मार्बल, महागडे पडदे, महागडे कार्पेट खरेदी केली. यामुळे याबाबत त्यांनी उत्तरं देणं आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.