Govt Job Opportunity | महिला व बाल शिक्षण विभागात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शासकीय नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बाल विकास विभाग (Ministry of Women & Child Development) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. विभागामार्फत या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक- 04 जागा, मदतनीस तथा पहारेकरी- 02 जागा, स्वच्छता कर्मचारी -04 जागा, समुपदेशक -01 जागा,स्वयंपाकी- 02 जागा, काळजी वाहक – 01 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Govt Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 9 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://womenchild.maharashtra.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://bit.ly/3L6G2jS

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक – 422011.

महत्वाच्या बातम्या