Aaditya Thackeray | “सरकारकडे अहंकार पण दूरदृष्टी नाही”; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray | मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण चांगलंच चिंगळलेलं पाहायला मिळतं आहे. स्थानिक लोकांनी आंदोलन करता विरोध केला आहे. तर या प्रकारात अनेक जेष्ठ राजकीय नेत्यांनी भाष्य केले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारसू प्रकल्पाचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 जानेवारी, 022 ला पत्र दिले होते. याकरिता 13 हजार एकर जमीन राज्य शासनाला उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. अशी माहिती सध्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी यांनी दिले आहेत तरीही ठाकरे गटाकडून सध्या या प्रकल्पना विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आताच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांनी ट्विट करता शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लबोल केला आहे.

अहंकारापोटी केवळ प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे ( Trying to push the project only because of ego: Aditya Thackeray )

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, फक्त कोकणातच नाही तर राज्याच्या विविध जिल्ह्यात मिंधे-फडणवीस सरकार जनतेचं मत जाणून न घेता स्वतःच्या अहंकारापोटी केवळ प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. तर फक्त या सरकारकडे अहंकार आहे दूरदृष्टी नाही. तसचं त्यांनी ‘आरे, मुंबई – अजनी वन, नागपूर – बारसू, रत्नागिरी – पांजरपोळ, नाशिक – पटवर्धन पार्क, मुंबई – पुणे रिव्हरफ्रंट विकास – वेताळ टेकडी, पुणे- वरडा गाव (कोळसा वॉशरीज), नागपूर या प्रकल्पांचे नाव या प्रकल्पात काय साम्य आहे? असा देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं होत की, बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ हे आमच्या मातोश्री’ बंगल्यावर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते. त्यावेळी देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. तर सत्तांतरानंतर देखील अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हा मुद्दा चांगलाच ओढून ठरला होता परंतु रिफायनरी प्रकल्पाबाबत त्याची भूमिका विरोधात असल्याचं बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-