Share

“उद्धव ठाकरेंनी ‘चाटम’ म्हटलं, लेकाने थेट ‘चिल्लर’ म्हटलं!”; आदित्य ठाकरेंचा अमित साटमांवर सणसणीत वार!

Aaditya Thackeray dismisses BJP’s Amit Satam as “Chillar” (insignificant) while responding to allegations, intensifying the war of words ahead of BMC elections.

Published On: 

Aaditya Thackeray dismisses BJP's Amit Satam as "Chillar" (insignificant) while responding to allegations, intensifying the war of words ahead of BMC elections.

🕒 1 min read

मुंबई–  राजकारणाचा स्तर कुठपर्यंत खाली जाणार आहे? आधी ‘मामु’, मग ‘चाटम’ आणि आता थेट ‘चिल्लर’! मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे विरुद्ध भाजप हा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘मामु’ असा केला होता, त्याला उद्धवजींनी ‘चाटम’ म्हणून प्रत्युत्तर दिलं. पण आता युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी साटम यांच्याबाबत बोलताना पातळीच बदलून टाकली आहे.

Aaditya Thackeray on Amit Satam

साटम यांनी ठाकरेंवर ३ लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर विचारलं असता आदित्य ठाकरे एका वाक्यात विषय संपवत म्हणाले, “मी अशा ‘चिल्लर’ लोकांना ओळखत नाही आणि त्यांना उत्तरही देत नाही.” आदित्य यांच्या या एका वाक्याने भाजप गोटात चांगलीच आग लागण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेताना म्हटलं की, “मला वाटलं होतं ते सुसंस्कृत आहेत, पण आता त्यांचा खरा चेहरा उघड झालाय. कोस्टल रोडचं काम आम्ही केलं, पण श्रेय भाजप घेतंय. मग नोटबंदी, पडता रुपया आणि अतिरेकी हल्ल्यांचे श्रेयही तुम्ही घेणार का?” असा तिखट सवाल त्यांनी केला. सध्या महायुतीत पैशांवरून आणि बंगल्यांवरून भांडणं सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

२० वर्षांनी राज ठाकरे सेना भवनात!

एकीकडे आरोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे एक ऐतिहासिक क्षणही पाहायला मिळाला. तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाची पायरी चढली. यावेळी ठाकरे बंधूंनी ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रसिद्ध केला. यात ७०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी आणि ५ वर्षांत १ लाख परवडणारी घरं देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. भाजपने मात्र हा वचननामा ‘कॉपी-पेस्ट’ असल्याची टीका केली आहे. आता या ‘चिल्लर’ आणि ‘चाटम’ वादात मुंबईकर कोणाचं ऐकणार, हे पाहणं रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही