🕒 1 min read
मुंबई – राजकारणात ‘टायमिंग’ला फार महत्त्व असतं, आणि हेच टायमिंग ठाकरेंचं चुकलंय असा दावा आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे. राज आणि उद्धव एकत्र आल्याने मुंबईत मोठं परिवर्तन होईल, अशी चर्चा असतानाच फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिलेल्या मुलाखतीत एक वेगळीच ‘थिअरी’ मांडून विरोधकांचा फुगा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
फडणवीस स्पष्ट शब्दांत म्हणाले, “ठाकरे बंधूंच्या युतीला खूप उशीर झालाय. जेव्हा दोघांची मतं संपली, तेव्हा हे एकत्र आलेत. जर २००९ मध्ये हे दोघे एकत्र आले असते, तर रिजल्ट वेगळा असता.” आता दोघांची मतांची टक्केवारी इतकी घसरली आहे की, त्यांना ना मराठी माणूस मत देणार, ना अमराठी! त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची आम्हाला काडीमात्र चिंता नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाकरेंच्या ‘मराठी बाण्या’वरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “मराठी माणूस दक्षिण मुंबईतून हद्दपार झाला, तेव्हा तुम्ही काय केलं? फक्त मोर्चे काढले… मोर्च्यांनी लोकांचं पोट भरतं का?” असा तिखट सवाल फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विचारला.
बीडीडी चाळीचा दाखला देताना फडणवीस म्हणाले, “तुमचा डोळा खासगी बिल्डरांवर होता, पण मी हा प्रकल्प ‘म्हाडा’कडे दिला आणि ८० हजार मराठी कुटुंबांना मुंबईत हक्काचं घर मिळवून दिलं.” ठाकरे बंधूंच्या भावनिक राजकारणाला आता विकासानेच उत्तर मिळणार, हेच फडणवीसांच्या या आक्रमक पवित्र्यावरून स्पष्ट होतंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मुरली अण्णा, स्वतःच्या गिरेबानात पाहा…”; रुपाली ठोंबरेंनी भाजपचं वस्त्रहरण केलं, म्हणाल्या “तुमची नीती वापरा आणि…!”
- “नील सोमय्यांचा ‘बिनविरोध’चा फुगा फुटला; राऊतांनी टाकला मोठा डाव; आता ‘या’ तगड्या उमेदवाराशी होणार थेट लढत!
- अनिल परबांच्या ‘खास’ माणसाचा पत्ता कट; ठाकरेंचा मोठा ॲक्शन प्लॅन, २६ बंडखोरांची हकालपट्टी!













