Share

धनंजय मुंढे यांना मोठा धक्का, बजरंग सोनवणे यांचा शरद पवार गटात प्रवेश

🕒 1 min read Bajrang Sonwane । अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते बजरंग सोनवणे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. सोनवणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.  धनंजय मुंढे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहिले जाते. शरद … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bajrang Sonwane । अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते बजरंग सोनवणे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. सोनवणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.  धनंजय मुंढे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहिले जाते.

शरद पवार यांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane ) यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार समर्थक उपस्थित होते.

Bajrang Sonwane join Sharad Pawar group

पक्षप्रवेशा वेळी बजरंग सोनवणे म्हणाले की, “मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करतोय. तसं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतो. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मी प्रवेश करतोय. मी जास्त काही सांगणार नाही.

पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस तालुक्याध्यक्ष मी होतो. बऱ्याच जणांना ते माहिती नसेल. बरेचजण माझा इतिहास शोधताना मी भाजपमधून आलो असं म्हणतील. पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी तालुकाध्यक्ष होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या विचारांबरोबर मी काम केलं”, असं बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane ) म्हणाले.

पुढे बोलतांना सोनवणे म्हणाले, ”मला बीड जिल्ह्यातील 5 लाख पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान केलं. या नागरिकांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी मी शरद पवार यांच्यासोबत येत आहे”, असं बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane ) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही