Warm Water | टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून राज्यात गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. अशात बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.
या समस्या टाळण्यासाठी दिवसभरात सात ते आठ ग्लास पिणे अत्यंत आवश्यक असते. हिवाळ्यामध्ये संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी तुम्ही दिवसभरात सात ते आठ ग्लास कोमट पाणी पिऊ शकतात.
त्याचबरोबर दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी पिऊन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने पोट निरोगी राहते. हिवाळ्यामध्ये कोमट पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Benefits of Warm Water)
हिवाळ्यामध्ये नियमित कोमट पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. बदलत्या हवामानामुळे अनेकांना सर्दी, खोकला, घसा दुखी यांसारखे समस्या होतात.
या समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचे सेवन करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती आणखीन मजबूत होण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Benefits of Warm Water)
या हिवाळ्यामध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कोमट पाण्याचे सेवन करणे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
थंडीमध्ये दिवसाची सुरुवात चहा ऐवजी कोमट पाण्याने केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. कारण कोमट पाणी प्यायल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते, परिणामी वजन कमी होते.
पचनसंस्था मजबूत राहते (Digestive system remains strong-Benefits of Warm Water)
हिवाळ्यामध्ये गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्टता, पोट दुखी इत्यादी समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमित सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करू शकतात.
रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने पोट चांगले साफ होते. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Chance of rain in the state
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहे. एकीकडे गारठा वाढत चालला आहे तर दुसरीकडे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तर उर्वरित राज्यात पहाटेच्या वेळी थंडी तर दुपारच्या वेळी उन्हाचा तडाका बसण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. अशात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | मराठा आरक्षणावर कोणी बोलत असेल तर सोडणार नाही; मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना धारेवर धरलं
- Govt Job Opportunity | मेगा भरती अलर्ट! महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती सुरू
- St Bus | जनसामान्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीत संप न करण्याचा ST कर्मचाऱ्यांचा निर्णय
- Chitra Wagh | सध्या संजय राऊतांची अवस्था म्हणजे ‘बडा घर, पोकळ वासा’ – चित्रा वाघ
- Sanjay Raut | अमित शाह अजित पवारांना मुख्यमंत्री करतील – संजय राऊत