Share

ह्युंदाई, महिंद्राला धोबीपछाड! टाटा मोटर्सची जोरदार मुसंडी; ‘या’ दोन गाड्यांनी बदललं मार्केटचं गणित

Tata Motors बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी; ह्युंदाई आणि महिंद्राला टाकले मागे

Published On: 

Tata Motors overtakes Hyundai and Mahindra to become India's 2nd largest carmaker in Q3 FY26.

पुणे/मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये (Indian Automobile Market) सध्या टाटा मोटर्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परदेशी कंपनी ह्युंदाई आणि देशी स्पर्धक महिंद्रा अँड महिंद्राला मागे टाकत टाटा मोटर्स (Tata Motors) आता देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार कंपनी बनली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ (Q3 FY26) या तिमाहीत टाटाने ही विक्रमी झेप घेत मार्केटमधील समीकरणे बदलून टाकली आहेत.

Tata Motors Becomes No 2 Car Maker

केंद्र सरकारच्या ‘वाहन’ (VAHAN) पोर्टलवरील आकडेवारीनुसार, गेल्या तीन महिन्यांत टाटा मोटर्सने तब्बल १ लाख ८९ हजार गाड्यांची नोंदणी केली. याच काळात महिंद्राने १.८० लाख तर ह्युंदाईने १.७० लाख गाड्या विकल्या. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातही टाटाने ५१,९६३ युनिट्ससह बाजी मारली आहे. या ऐतिहासिक यशामागे टाटाची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही ‘नेक्सॉन’ (Nexon) आणि नोव्हेंबरमध्ये लाँच झालेली ‘सिएरा’ (Sierra) यांचा सिंहाचा वाटा आहे. नेक्सॉनने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले, तर २१ वर्षांनंतर परतलेल्या ‘सिएरा’ला ग्राहकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

टाटा मोटर्सचे एमडी शैलेश चंद्रा यांनी या यशाचे श्रेय GST 2.0 सुधारणा आणि ग्राहकांचा एसयूव्हीकडे वाढलेला कल याला दिले आहे. याशिवाय टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीत ४९.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जरी २०२५ च्या वार्षिक आकडेवारीनुसार टाटा अजूनही तिसऱ्या क्रमांकावर असली, तरी वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांतील हा ‘उलटफेर’ प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवणारा ठरला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही