🕒 1 min read
मुंबई – क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल आणि कोणता खेळाडू रातोरात स्टार होईल, हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) आला आहे. आयपीएल २०२६ (IPL 2026) सुरू व्हायला अजून अवकाश आहे, पण त्याआधीच संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सच्या गोटात आनंदाची लाट पसरली आहे. कारण, त्यांनी लिलावात खरेदी केलेल्या एका २१ वर्षीय युवा फलंदाजाने चक्क द्विशतक (Double Century) झळकावून गोलंदाजांची पिसे काढली आहेत.
Aman Rao Double Century in Vijay Hazare Trophy
शेवटच्या चेंडूवर षटकार अन् द्विशतक पूर्ण!
हैदराबाद आणि बंगाल यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात अमन राव (Aman Rao) नावाचं वादळ घोंगावलं. हैदराबादकडून ओपनिंगला आलेल्या अमनने सुरुवातीपासूनच बंगालच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. पण, खरा थरार तर डावाच्या शेवटी पाहायला मिळाला. अमन १९४ धावांवर खेळत असताना डावाचा शेवटचा चेंडू बाकी होता. समोर गोलंदाज होता आकाश दीप. अमनने या चेंडूवर जोरदार प्रहार करत थेट षटकार खेचला आणि १५४ चेंडूत २०० धावा पूर्ण केल्या. त्याच्या या इनिंगमुळे हैदराबादने ३५२ धावांचा डोंगर उभा केला.
१३ षटकारांची आतषबाजी अमन रावच्या (Aman Rao) या इनिंगमध्ये त्याने मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी केली. त्याच्या खेळीत तब्बल १२ खणखणीत चौकार आणि १३ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. त्याला राहुल सिंग आणि कर्णधार तिलक वर्मा यांची चांगली साथ मिळाली, पण आजचा दिवस पूर्णपणे अमनने गाजवला.
राजस्थान रॉयल्सने अवघ्या ३० लाखांत खरेदी केलंय
आयपीएल २०२६ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) हैदराबादच्या या हिऱ्याला अवघ्या ३० लाख रुपयांत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं. तेव्हा अमनबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती. पण आता त्याच्या या खेळीने त्याने आपली ‘व्हॅल्यू’ सिद्ध केली आहे. राजस्थानला आता आयपीएलमध्ये (IPL 2026) एका तगड्या भारतीय बॅटरचा पर्याय मिळाला आहे, हे नक्की!
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसमुक्त भारत’ गेलं खड्ड्यात? अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी बांधली ‘गाठ’; एकनाथ शिंदेंना धोबीपछाड!
- वर्ल्डकप गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; खेळाडू संतापली
- Shikhar Dhawan: शिखर धवन पुन्हा बोहल्यावर? ‘या’ तारखेला वाजणार सनई-चौघडे
- Ranapati Shivray Swari Agra : चिन्मय मांडलेकर नाही, आता ‘हा’ अभिनेता साकारणार शिवराय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












