Share

‘काँग्रेसमुक्त भारत’ गेलं खड्ड्यात? अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी बांधली ‘गाठ’; एकनाथ शिंदेंना धोबीपछाड!

Major political twist in Ambernath as BJP joins hands with Congress to keep the Shinde faction out of power.

Published On: 

Major political twist in Ambernath as BJP joins hands with Congress to keep the Shinde faction out of power, securing a majority with 32 seats.

अंबरनाथ – राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं म्हणतात. पण अंबरनाथमध्ये जे घडलंय, ते पाहून खुद्द राजकीय पंडितही चक्रावून गेलेत. ज्या काँग्रेसला संपवण्यासाठी भाजपने देशभर रान उठवलं, त्याच काँग्रेसच्या हातात हात घालून भाजपने चक्क उप-मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाला ‘दे धक्का’ दिला आहे! मुंबईच्या वेशीवर घडलेल्या या राजकीय घडामोडीने महायुतीत एकच खळबळ उडाली आहे.

Ambernath BJP Alliance with Congress

नेमकं गणित काय जुळलं?

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (Eknath Shinde गट) २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण राजकारणात आकड्यांपेक्षा ‘मॅनेजमेंट’ महत्त्वाचं असतं, हे भाजपने सिद्ध केलं. शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने चक्क काँग्रेस आणि अजित पवार गटाला जवळ केलं आहे. भाजपचे १६ + काँग्रेसचे १२ + अजितदादांचे ४ = एकूण ३२ नगरसेवक अशी नवी मोट बांधून भाजपने बहुमत सिद्ध केलं आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुले (Tejashree Karanjule) विजयी झाल्या असून शिंदे गटाला विरोधात बसावं लागणार आहे.

एकनाथ शिंदे गट भडकला, म्हणाला ‘अभद्र युती’

आपल्याच मित्रपक्षाने काँग्रेससोबत संसार थाटल्याने शिंदे गट चांगलाच संतापला आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “काँग्रेसमुक्त भारताची वल्गना करणाऱ्या भाजपने काँग्रेसशी (BJP Congress Alliance) हातमिळवणी करून शिवसेनेचा घात केला आहे. ही ‘अभद्र युती’ आहे.”

यावर भाजप गप्प बसेल तर नवलच! शिंदे गटाच्या आरोपांना भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलंय. “गेल्या २५ वर्षांत तुम्ही जो भ्रष्टाचार केला, त्या लोकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली असती, तर ती खरी अभद्र युती ठरली असती,” असा टोला त्यांनी लगावला. आम्ही युतीसाठी अनेकदा संपर्क केला, पण शिंदेंच्या नेत्यांनी आम्हाला दाद दिली नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत, भाजपने ‘अंबरनाथ पॅटर्न’ राबवत शिंदेंना चांगलाच धडा शिकवला आहे. आता या नव्या मैत्रीचे पडसाद राज्यात उमटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही