IND vs NZ: तिसरा सामना रद्द होणार? इंदूरमध्ये पावसाची शक्यता किती? हवामान खात्याचा मोठा अपडेट

इंदूरमध्ये होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट आहे का? जाणून घ्या वेदर रिपोर्ट आणि टीम इंडियाची स्थिती.

Published On: 

New Zealand Playing 11 vs India | Shubman Gill | ind vs nz

IND vs NZ: मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्याने आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील थरार शिगेला पोहोचला आहे. मालिकेचा निकाल आता शेवटच्या सामन्यावर अवलंबून असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिली मॅच गाजवली, पण दुसऱ्या सामन्यात कीवींनी जोरदार कमबॅक करत भारताला धक्का दिला. त्यामुळेच इंदूरमध्ये १८ जानेवारीला होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असाच असणार आहे.

IND vs NZ: 3rd ODI Weather Update: इंदूरमध्ये पावसाची शक्यता किती?

पण, या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचं सावट असणार का? ही धाकधूक फॅन्सच्या मनात नक्कीच आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याबाबत हवामान खात्याचा अंदाज दिलासा देणारा आहे. ताज्या रिपोर्टनुसार, सामन्याच्या दिवशी इंदूरमध्ये पावसाची शक्यता ० टक्के आहे. म्हणजेच, India vs New Zealand यांच्यातील हा निर्णायक सामना पूर्ण ५०-५० षटकांचा होणार हे नक्की.

दिवसभर कडक ऊन असेल आणि तापमान २७ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना कोणत्याही व्यत्ययाविना हा सामना एन्जॉय करता येणार आहे.

दुसरीकडे, भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी आयुष बदोनीला स्क्वाडमध्ये एन्ट्री मिळाली आहे. दुसऱ्या सामन्यात नितीश कुमार रेड्डीला संधी मिळाली होती, आता निर्णायक लढतीत बदोनीला पदार्पणाची संधी मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, आयुष बदोनी.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही