Share

Pune Exit Poll: पुण्यात ‘दादा’ फॅक्टर चालला की पुन्हा कमळ फुललं? एक्झिट पोलचा आकडा धक्कादायक!

पुण्यात भाजपा ९३ जागांसह पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली मोठी झेप, तर ठाकरे-शिंदे गटाची पाटी कोरीच? वाचा एक्झिट पोल.

Published On: 

Ajit Pawar vs Murlidhar Mohol Pune BJP | PMC Exit Poll 2026

Pune Exit Poll: पुण्याच्या सत्तेची चावी नेमकं कोणाकडे? हा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून लटकला होता. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर आज अखेर मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता राजकीय वर्तुळात आकडेवारीची चर्चा सुरू झाली आहे. मतदान संपताच समोर आलेल्या PMC Exit Poll च्या आकडेवारीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

PMC Exit Poll 2026: BJP likely to retain power

PRAB या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पुण्यात ९३ जागांसह भाजपा स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. पण खरी गंमत दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीत असूनही स्वतंत्र चूल मांडणाऱ्या अजित पवार गटाने तब्बल ४३ जागांवर मुसंडी मारण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या निवडणुकीत ‘मैत्रीपूर्ण लढत’ कोणाच्या पथ्यावर पडणार, याची जोरदार चर्चा होती. भाजपाने ४० माजी नगरसेवकांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी थेट अजित पवारांच्या गळाला लागत उमेदवारी मिळवली होती. त्यामुळेच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) असाच सामना रंगला होता. आकडेवारीनुसार, शरद पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी ८ जागांवर समाधान मानावं लागेल, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ७ आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अवघ्या ६ जागांपर्यंत सीमित राहील, असा अंदाज आहे.

पुणे हे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होतं, पण २०१७ मध्ये भाजपाने गड काबीज केला. आता २०२२ पासून रखडलेली ही निवडणूक पार पडली असली, तरी अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला किती फटका बसलाय, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. तूर्तास तरी एक्झिट पोलने (PMC Exit Poll ) भाजपला ‘गुलाल’ उधळण्याची संधी दिली आहे.

 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही