🕒 1 min read
गुवाहाटी : वनडे मालिकेत झालेला अपमान भारतीयांच्या जिव्हारी लागला होता का? कारण ज्या पद्धतीने टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवलंय, ते पाहता असंच म्हणावं लागेल. गुवाहाटीच्या मैदानावर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात (IND vs NZ 3rd T20) कीवी संघाला 8 विकेट्सने धूळ चारली आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी निर्विवाद विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, विजयासाठी आवश्यक असलेलं 154 धावांचं आव्हान भारताने फक्त 10 ओव्हरमध्येच पूर्ण करून एक नवा विक्रम रचला आहे.
दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो युवा स्टार अभिषेक शर्माने! त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली. अभिषेकने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकून स्टेडियम डोक्यावर घेतलं. तो 20 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 68 धावांवर नाबाद राहिला. त्याला साथ मिळाली ती आपला कॅप्टन ‘स्काय’ची. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सलग दुसऱ्या सामन्यात फॉर्म कायम राखत 26 चेंडूत 57 धावांची आतषबाजी केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडचे गोलंदाज अगदी हतबल दिसले.
IND vs NZ 3rd T20
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 9 बाद 153 धावा केल्या होत्या. डेवोन कॉन्वे आणि रचिन रवींद्रला स्वस्तात माघारी धाडत हर्षित राणा व हार्दिक पांड्याने सुरुवातीलाच धक्के दिले. पण भारताच्या बॅटिंगसमोर हे टार्गेट अगदीच खुजं ठरलं. एकीकडे धावांचा पाऊस पडत असताना सलामीवीर संजू सॅमसन मात्र पुन्हा एकदा ‘झिरो’वर बाद झाला, ही चिंतेची बाब ठरली आहे. भारताने या दणदणीत विजयासह वनडे मालिकेतील पराभवाचा वचपा (Revenge) काढला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ही ICC नाही, तर इंडियन क्रिकेट काऊन्सिल!’; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माजी अध्यक्षांचा थेट भारतावर वार
- भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होणार? अमेरिकेकडून मोठे संकेत!
- T20 World Cup : बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तानही स्पर्धेबाहेर?; मोहसीन नक्वींनी दिली थेट ‘ही’ धमकी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












