‘ही ICC नाही, तर इंडियन क्रिकेट काऊन्सिल!’; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माजी अध्यक्षांचा थेट भारतावर वार

‘आयसीसी म्हणजे इंडियन क्रिकेट काऊन्सिल’, असं म्हणत पाकिस्तानच्या माजी अध्यक्षांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेश प्रकरणावरून त्यांनी हा संताप व्यक्त केला.

Published On: 

Najam Sethi on ICC: 'ही तर इंडियन क्रिकेट काऊन्सिल'; सेठींचा भारतावर आरोप!

जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा (BCCI) दबदबा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण हा दबदबा आता थेट आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी चक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलला (ICC) ‘इंडियन क्रिकेट काऊन्सिल’ असं संबोधल्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

Najam Sethi on ICC

बांगलादेशला टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर काढून त्याजागी स्कॉटलंडला संधी देण्याच्या ICC च्या निर्णयावरून सेठी चांगलेच भडकले आहेत. या निर्णयावर आगपाखड करताना त्यांनी थेट बीसीसीआयवर निशाणा साधला. “जर पाकिस्तानसोबत इतर देशही एकत्र आले, तरच ICC ला समजेल की ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे, इंडियन क्रिकेट काऊन्सिल नाही,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

सेठी यांनी बांगलादेशच्या वर्ल्ड कप बहिष्काराच्या निर्णयावर भाष्य केलं. ते म्हणाले, “सध्याचे पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. पाकिस्ताननेही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला पाहिजे, या भूमिकेचा मी विचार करतोय.”

बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असल्याने तिचा प्रभाव जास्त आहे, हे उघड गुपित आहे. पण सेठींच्या या थेट आरोपामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांमध्ये आधीच असलेला तणाव आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. बांगलादेश अधिकृतपणे टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून बाहेर पडला असून, आता पाकिस्तान काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही