Share

शाहरुख खानचे आभार मानले म्हणून ट्रोल? प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, सलमानचाही काढला विषय!

शाहरुख खानचे आभार मानल्याने ट्रोल झालेल्या दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत. ‘मदत करणाऱ्याचा धर्म बघून उपकार विसरु नये’ असे ते म्हणाले.

Published On: 

Pravin Tarde Shah Rukh Khan - Pravin Tarde giving interview about Shah Rukh Khan

🕒 1 min read

शाहरुख खानचे आभार मानले म्हणून एखाद्याला थेट आपल्या हिंदुत्वाचीच साक्ष द्यावी लागेल, असा विचार तुम्ही कधी केलाय का? होय, सध्या ‘देऊळ बंद 2’ च्या यशानंतर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दिग्दर्शक प्रवीण तरडेंवर (Pravin Tarde) अशीच वेळ आलीये.

सिनेमाच्या पोस्ट-प्रॉडक्शनसाठी शाहरुखच्या (Shah Rukh Khan) ‘रेड चिलीज’ स्टुडिओने आर्थिक मदत केल्याचं प्रवीण तरडेंनी नुकतंच एका मुलाखतीत उघड केलं होतं. पण या एका आभार प्रदर्शनावरून सोशल मीडियावर त्यांना धर्मावरून टार्गेट करण्यात आलं. आता मात्र तरडेंनी या ट्रोलर्सची चांगलीच शाळा घेतली आहे.

Pravin Tarde on Shah Rukh Khan

नुकतंच ‘पॉडकट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रवीण तरडेंनी स्पष्टच सांगितलं, “इथे हिंदू-मुस्लीम म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी रेड चिलीजकडे डिस्काउंट मागितला. शाहरुखनं त्याच्या टीमला फक्त सिनेमा कसा आहे, एवढंच विचारलं.”

सिनेमा उत्तम असल्याचं कळताच शाहरुखने फक्त पैशात सवलतच दिली नाही, तर थेट DCP (सिनेमाची फायनल कॉपी) हातात दिली. “पैसे पूर्ण भरल्याशिवाय कुणीही DCP देत नाही, पण शाहरुखनं सांगितलं की बिलाचं नंतर बघूया. हा त्याचा मोठेपणा नाही का रे?” असा खडा सवाल तरडेंनी विचारला.

“मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये,” असं म्हणत त्यांनी सडेतोड भूमिका मांडली. एखाद्यानं मोठ्या मनानं मदत केली, तर जात-पात आणि धर्म बघून आपण त्याचे उपकार विसरायचे का? असा रास्त मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी सलमान खानचंही उदाहरण दिलं. “सलमान खान सुद्धा त्याच्या घरी गणपती आणतोच ना. तो सोशल मीडियावर हे सगळं शेअर सुद्धा करतो. जो चांगला आहे तो चांगला आहे,” असं ते म्हणाले.

“गरजवंताला मदत करताना विचारसरणी आणि धर्म नसतो. जिथे विचार मांडायचे असतात, तिथे माणसाने कणखर राहिलंच पाहिजे,” असं म्हणत प्रवीण तरडेंनी या वादावर कायमचा पडदा टाकला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही