Share

विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं? राज्यपालांवर प्रकाश राज भडकले; तमिळनाडूत मोठी राजकीय खळबळ!

तमिळनाडूमध्ये थलपती विजयला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी नकार दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. यावरून अभिनेते प्रकाश राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Published On: 

Vijay Thalapathy CM News: राज्यपालांवर प्रकाश राज भडकले!

🕒 1 min read

राजकारणात जनतेने भरभरून कौल दिला तरी खुर्ची मिळेलच याची शाश्वती नसते, याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा तमिळनाडूत येत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या (Vijay Thalapathy) ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा करिष्मा केलाय.

पण तरीही विजयला मुख्यमंत्रीपदापासून मुद्दाम रोखलं जातंय का? असा गंभीर सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. याच मुद्द्यावरून आता अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी थेट तमिळनाडूच्या राज्यपालांवरच जोरदार हल्लाबोल केला आहे.

Vijay Thalapathy CM News

अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीकेने द्रमुक आणि अण्णाद्रमुकसारख्या मातब्बर पक्षांना धोबीपछाड देत २३३ पैकी तब्बल १०८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. पण सरकार स्थापनेसाठी ११८ आमदारांचा जादुई आकडा गाठणं गरजेचं आहे. स्वतः विजयने दोन जागांवरून विजय मिळवला आहे, त्यामुळे त्याला एक जागा सोडावी लागेल आणि पक्षाचे संख्याबळ १०७ वर येईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, ६ मे रोजी थलपती विजयने सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली होती. मात्र, पुरेसं बहुमत नसल्याचं सांगत राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही विजयने पुन्हा प्रयत्न केला, पण त्याला रिकाम्या हातानेच परतावं लागलं.

या संपूर्ण प्रकारामुळे तमिळनाडूचं राजकारण चांगलंच तापलं आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर टीव्हीके कार्यकर्त्यांचा व्हिडिओ शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला. “राज्यपालांचे हे वर्तन घृणास्पद आणि अस्वीकार्य आहे. बहुमताचा निर्णय राजभवनात नाही, तर विधानसभेत होतो,” असा मोठा गौप्यस्फोट करत त्यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. विजयला जनतेचा कौल मिळाला असून त्याला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळायलाच हवी, अशी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका प्रकाश राज यांनी घेतली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही