Share

माझ्याजवळ मोदींची कुंडली, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय देशातील युवक थांबणार नाही; गांधींचे आरपारच्या लढाईचे रणशिंग

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक झाले असून, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published On: 

Rahul Gandhi aggressively speaking during a press address

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: ‘माझ्याजवळ मोदींची कुंडली आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही. देशातील युवक आता थांबणार नाही,’ अशा आक्रमक शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे.

सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत असून ही त्यांची मोठी चूक आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते जेवढा बचाव करतील, तेवढे आम्ही त्यांच्या नियंत्रकांपर्यंत पोहोचू. कितीही वेळ लागला तरी राजीनामा घेतल्याशिवाय देशातील तरुण मागे हटणार नाही, असा थेट इशारा गांधी यांनी दिला.

देशभरातील आंदोलनांची स्थिती मांडताना त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य केले. पोलीस सध्या अस्वस्थ आहेत, तरुणांना मारहाण करण्यासाठी आम्हाला का भाग पाडले जात आहे, असे तेच विचारत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आरएसएसचे गुंड महिलांना मारहाण करत आहेत आणि पोलिसांना एकप्रकारे पेलेट गन वापरण्यास सांगितले जात आहे. संपूर्ण दिल्लीचे आता किल्ल्यात रूपांतर करण्यात आले असून रेल्वे आणि बसेस थांबवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाला (SIR) स्थगिती देण्याची आणि मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची प्रमुख मागणी लावून धरली आहे. पहिल्या दिवशी निवडणूक आयोगाकडे शांततेत जाणाऱ्या नेत्यांना रोखून बसमध्ये डांबण्यात आले. घरीच आंदोलन करा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जंतर मंतर आणि राजघाटावरही मारहाण करण्यात आली, अशी माहिती गांधी यांनी दिली.

‘आम्ही प्रत्येकाच्या आवाजाला धर्म मानतो आणि त्यावरच हल्ला होत आहे,’ असे सांगत त्यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार नाहीत, त्यामुळे आता विरोधी पक्षनेते सर्वोच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल करणार आहेत. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी कोट्यवधी तरुण एकत्र आले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही