Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका? गोपनीय अहवालानंतर सुरक्षा वाढवली

ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका असल्याच्या गोपनीय अहवालानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, विरोधकांच्या आक्रमक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

Published On: 

CEC Gyanesh Kumar election commission headquarters

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला मोठा धोका असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. या नव्या गोपनीय अहवालानंतर आणि राजधानीतील उग्र प्रदर्शनांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश कुमार यांना यापूर्वीच ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, आता स्थानिक जिल्हा पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केल्याने नवी दिल्लीतील ज्ञानेश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर आणि निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाजवळ अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक सध्या अत्यंत आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ‘इंडिया’ आघाडी आणि काँग्रेसने दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी-वाड्रा आणि घटक पक्षांचे खासदार सहभागी झाले आहेत. यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रा येथील ज्ञानेश कुमार यांच्या घरासमोरही उग्र निदर्शने केली होती. सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘Gen-Z’ च्या रस्त्यावर पोलिसांची वाहने पंक्चर करण्याचा आणि वाहनांची चावी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेससोबतच आम आदमी पक्ष आणि डाव्या पक्षांनी जंतरमंतरवर ठाण मांडले आहे. आता कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) जंतरमंतरवर आंदोलन होणार असून, परवानगी नाकारल्यास जिथे असू तिथेच आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाला कानपिचक्या दिल्या आहेत.

विरोधकांचा वाढता जोर आणि विविध पक्षांची आंदोलने पाहता, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनाची मोठी रणभूमी पाहायला मिळण्याची आणि बऱ्याच घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. या सर्व परिस्थितीवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला मोठा धोका असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. या नव्या गोपनीय अहवालानंतर आणि उग्र प्रदर्शनांच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही