Share

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक; राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी पुन्हा घेतले ताब्यात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या खासदारांसह जंतरमंतरकडे जाणाऱ्या राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे.

Published On: 

Rahul Gandhi FIR case

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नवी दिल्लीत पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. इंडिया आघाडीच्या सुमारे २०० खासदारांसोबत जंतरमंतर येथे आंदोलनासाठी कूच करत असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

तत्पूर्वी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर सर्व खासदार तीन बसेसमधून जंतरमंतरकडे जाण्यास निघाले असता, पोलिसांनी या बसेस मैदानापासून शंभर मीटर अंतरावरच रोखल्या.

पोलिसांनी या आंदोलनाला अटकाव करताच राहुल गांधी यांनी तिथेच ठिय्या मांडला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील लोकशाही धोक्यात आणली असून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावाच लागेल, असा थेट इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

याआधी मंगळवारीदेखील राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर असाच मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे गांधी यांनी आकाशवाणी भवन येथे तब्बल आठ तास ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर मंगळवारी रात्रीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या सुमारे २०० खासदारांसोबत जंतरमंतर येथे आंदोलनासाठी कूच करत असताना राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही