Share

कपिल देव, गावस्करांचे पाक सरकारला पत्र; तुरुंगातील इम्रानसाठी १४ दिग्गजांचं पत्र धडकलं!

तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या मदतीसाठी कपिल देव आणि सुनील गावस्कर सरसावले आहेत. १४ दिग्गजांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहीत चिंता व्यक्त केली आहे.

Published On: 

Imran Khan Health: कपिल देव, गावस्करांचे पाक सरकारला पत्र!

मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी खेळाडूंचा ‘क्लास’ कायम असतो, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि १९९२ चे वर्ल्ड कप विजेते कर्णधार इम्रान खान (Imran Khan) सध्या तुरुंगात नरकयातना भोगत आहेत आणि आता त्यांच्या मदतीसाठी सीमेपलीकडून चक्क भारतीय दिग्गज धावून आले आहेत. इम्रान खान यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून, कपिल देव (Kapil Dev) आणि सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी थेट पाकिस्तान सरकारला पत्र लिहिलं आहे.

इम्रान खान गेल्या ८०० हून अधिक दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांची बहीण अलीमा खानम यांनी नुकतीच इम्रान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, इम्रान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी केवळ १५ टक्के राहिली असल्याचा दावा त्यांच्या वकिलाने कोर्टात केला आहे.

Imran Khan Health

प्रशासनाकडे तीन महिने तक्रार करूनही काहीही हालचाल झाली नाही, त्यामुळे आता जागतिक स्तरावरून दबाव वाढत आहे. भारताचे महान कर्णधार Kapil Dev आणि Sunil Gavaskar यांच्यासह जगातील १४ माजी कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून इम्रान यांच्यावर योग्य उपचार करण्याची मागणी केली आहे. या पत्रावर स्टीव्ह वॉ, क्लाइव्ह लॉईड, ॲलन बॉर्डर, जॉन राईट, ग्रेग चॅपेल अशा दिग्गजांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

“इम्रान यांनी १९९२ चा वर्ल्ड कप जिंकून देत पाकिस्तानला नवी ओळख दिली. त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा दिली आहे. आम्ही त्यांच्यासोबत खेळलोय, त्यांच्याकडून शिकलोय. आज ते अशा अवस्थेत आहेत, हे पाहून चिंता वाटते,” अशा भावना या पत्रातून व्यक्त करण्यात आल्या आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन खेळाडू धर्म निभावल्याने या पत्राची सध्या जगभर चर्चा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install