🕒 1 min read
राजकारणात आश्वासने सगळेच देतात, पण सत्तेत आल्यावर ती पाळणारे किती? राजकारणात प्रवेश करून थेट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गाठणं ही सोपी गोष्ट नाही. पण, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी हे करून दाखवलंय.
‘टीव्हीके’ (TVK) पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर सत्तेची सूत्रे हाती घेताच त्यांनी असा काही निर्णय घेतलाय, ज्याने सध्या संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री विजय यांनी थेट ‘ॲक्शन मोड’ मध्ये एन्ट्री घेतली आहे. त्यांनी संपूर्ण तामिळनाडूत शाळा, मंदिरे आणि बस स्थानकांच्या जवळील तब्बल ७१७ दारूची दुकाने अवघ्या दोन आठवड्यांत बंद करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.
Thalapathy Vijay CM
निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी राज्याला ‘व्यसनमुक्त’ करण्याचं जे आश्वासन दिलं होतं, त्याची ही पहिलीच मोठी स्टेप मानली जात आहे. विशेष म्हणजे, २०२५ या एकाच वर्षात तामिळनाडूला दारू विक्रीतून जवळपास ४८,३३४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तरीही अर्थव्यवस्थेपेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य देत विजय यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे.
या धडाकेबाज निर्णयाचं आता चौफेर कौतुक होत आहे. सुपरस्टार कमल हसन (Kamal Haasan) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट आपला पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले, “शाळा आणि धार्मिक स्थळांजवळची दारूची दुकाने हटवणं अत्यंत गरजेचं होतं. अनधिकृत दारू विक्रीला आळा घालणं ही सरकारची जबाबदारी आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या या ठाम निर्णयाचं मी समर्थन करतो.”
दुसरीकडे अभिनेता विशाल यानेही या निर्णयाला सलाम केला आहे. ‘आर.के. नगर’ सारख्या भागात शाळेतील मुलींना दारुड्यांच्या होणाऱ्या त्रासाचा दाखला देत त्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. थलपती विजय यांचा हा निर्णय सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच तापला असून, सर्वसामान्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं? राज्यपालांवर प्रकाश राज भडकले; तमिळनाडूत मोठी राजकीय खळबळ!
- हार्दिक पांड्या अंबानींना सोडणार? ‘चेन्नई’मध्ये एन्ट्रीच्या चर्चांनी आयपीएलमध्ये उडाली मोठी खळबळ!
- सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी धोक्यात; BCCI कडून मोठा झटका? ‘हा’ स्टार खेळाडू होणार नवा बॉस!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












