राज्यात पावसाची एन्ट्री अन् उकाड्यापासून सुटका; पण ‘या’ जिल्ह्यात उडाली दाणादाण!

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, बीडमध्ये मात्र घराचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Published On: 

Pre Monsoon Rain in Maharashtra dark clouds and heavy rain in village

पुणे – गेले अडीच महिने अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्याने तुम्हीही त्रस्त झाला होतात ना? अखेर राज्याला या भयंकर उष्णतेपासून थोडासा का होईना, मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. कुठे गारपीट, कुठे विजांचा कडकडाट तर कुठे थेट वादळवाऱ्याने अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे.

Pre Monsoon Rain in Maharashtra

गेले अनेक दिवस चंद्रपूर जिल्हा कडक उन्हात अक्षरशः होरपळून निघत होता. मात्र काल संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला. अर्धा तास चाललेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्याने चंद्रपूरकरांनी सुटकेचा श्वास घेतलाय. आगामी काळातही असाच पाऊस पडावा, अशी अपेक्षा इथले नागरिक करत आहेत.

दुसरीकडे… नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. पण काल नांदगाव आणि मनमाड शहरांसह ग्रामीण भागात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.

या मान्सूनपूर्व पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतजमिनीला ओलावा मिळाल्याने रखडलेल्या मशागतीच्या कामांना आता मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यातही काल संध्याकाळी काळेकुट्ट ढग दाटून आले अन् जोरदार पावसाने हजेरी लावली.

बीडमध्ये मात्र या पावसाने काहीशी चिंता वाढवली आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात दमदार पाऊस झाला खरा, पण मसेवाडी गावात धक्कादायक प्रकार घडला. वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की एका शेतकऱ्याच्या घराचे पत्रेच उडून गेले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हे शेतकरी कुटुंब ऐन पावसात उघड्यावर आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार… अजूनही अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे वाढलेल्या तापमानाचा आलेख आता हळूहळू खाली येईल, अशी आशा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही