Share

शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; एकनाथ शिंदे आज दिल्लीत

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांची मंत्रिपदासाठी नावं चर्चेत असून एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

Published On: 

Cabinet Expansion

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राजकीय रणनीतीमुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाला सलग धक्के बसत आहेत. नुकतेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटाला साथ दिली, तर विधान परिषद आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या पक्षप्रवेशामुळेही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जात असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदे शांतपणे पक्षाची ताकद वाढवत असल्याचे चित्र आहे. आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) चर्चेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी दोन दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनेकडून (Shivsena) दोन खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र असून ते गेल्या 12 वर्षांपासून खासदार आहेत. पक्ष विस्तारासाठी त्यांनी सातत्याने काम केले असून, अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

दुसरीकडे, ओमराजे निंबाळकर यांचे नावही मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांची सर्वाधिक चर्चा झाली होती. ओमराजे निंबाळकर यांचा मतदारांशी थेट संपर्क असून ते सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर काम करत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तरुण चेहऱ्याला संधी देण्याच्या दृष्टीने त्यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे.

NDA मध्ये शिवसेनेची वाढलेली ताकद

ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर केंद्रातील एनडीए (NDA) सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. भाजपानंतर एनडीएमध्ये सर्वाधिक खासदार असलेल्या मित्रपक्षांमध्ये शिवसेनेचा समावेश झाला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडे आता 13 खासदार आहेत, तर आंध्र प्रदेशातील Telugu Desam Partyकडे 16 खासदार आहेत.

गेल्या वर्षी एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला केंद्रात एक मंत्रिपद मिळाले होते. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचा सहभाग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही