Rohit Sharma | रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कसोटी कर्णधार होणार ‘हा’ खेळाडू? माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल झालेले दिसून आले आहेत.

या स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) कर्णधारबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तर दुसरीकडे त्याचं वय दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशात तो ( Rohit Sharma ) किती दिवस टीम इंडियाचं नेतृत्व करेल? असा सवाल उपस्थित झाला आहे.

त्याचबरोबर रोहित शर्मानंतर ( Rohit Sharma ) टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार कोण असेल? याबाबत क्रिकेट विश्वात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Who will be the new Test captain of Team India?

रोहित शर्मानंतर ( Rohit Sharma ) भारतीय संघाचा कसोटी कर्णधार कोण असेल? याबाबत आकाश चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना आकाश चोप्रा म्हणाले, “रोहित शर्मानंतर ऋषभ पंत ( Rishabh Pant ) किंवा शुभमन गिल ( Shubman Gill ) हे भारतीय संघाचं कसोटी कर्णधार पद सांभाळू शकतात.

ऋषभ पंत एक यष्टीरक्षक आहे आणि खेळ बदलण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे भविष्यामध्ये त्याला भारतीय कसोटी संघाचं कर्णधार बनवल्या जाऊ शकतं. त्याचबरोबर भविष्यात शुभमन गिल देखील भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होऊ शकतो.”

दरम्यान, ऋषभ पंत आणि शुभमन गिल हे दोन्हीही टीम इंडियातील स्फोटक फलंदाज आहे. ऋषभ पंत गेल्या डिसेंबरपासून अपघातामुळे क्रिकेट मैदानापासून दूर आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून तो आयपीएल 2024 मध्ये खेळणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे आयपीएल 2024 मध्ये शुभमन गिलला गुजरात टायटन्स या संघाचं कर्णधार बनवण्यात आलं आहे.

दोन्हीही खेळाडूंची क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर दोघांपैकी एक भारतीय संघाचा कसोटी कर्णधार होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.