Snow Fall | हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Snow Fall | टीम महाराष्ट्र देशा: डिसेंबर महिना सुरू झाला आहे. डिसेंबर महिन्यात देशात अनेक ठिकाणी बर्फवृष्टीला सुरुवात होते.

यामुळे अनेक पर्यटक बर्फवृष्टीचा ( Snow Fall ) आनंद लुटण्यासाठी फिरायला जाण्याची तयारी करत असतात. अशात तुम्ही देखील बर्फवृष्टी बघायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील सर्वोत्तम बर्फवृष्टी ( Snow Fall ) होणाऱ्या जागेबद्दल माहिती सांगणार आहोत. बर्फवृष्टी बघण्यासाठी तुम्ही खालील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

कुरफी, हिमाचल प्रदेश ( Kurfi, Himachal Pradesh-Snow Fall )

यावर्षी तुम्ही जर बर्फवृष्टी बघायला जाण्याचा विचार करत असाल तर कुरफी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हिमाचल प्रदेशमध्ये वसलेलं हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. शिमला शहरापासून हे अत्यंत जवळ आहे. या ठिकाणी तुम्ही शांततेत आणि निवांत बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकतात.

गुलमर्ग, काश्मीर ( Gulmarg, Kashmir-Snow Fall )

काश्मीरमधील गुलमर्ग हे एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे सर्वोत्तम नजारे अनुभवायला मिळतील.

या ठिकाणी होणारी बर्फवृष्टी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हे एक भारतातील सुंदर शहर आहे.

औली, उत्तराखंड ( Auli, Uttarakhand-Snow Fall )

उत्तराखंड राज्यामध्ये वसलेलं औली हे एक छोटसं आणि सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात होते.

त्याचबरोबर या ठिकाणी दरवर्षी पर्यटन विभागातर्फे स्कीइंग स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा बघण्यासाठी देशासह विदेशातील पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.

लडाख ( Ladakh-Snow Fall )

डिसेंबर महिन्यामध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी लडाख एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला बर्फवृष्टीसह अनेक निसर्गाचे सुंदर नजारे दिसतील. या ठिकाणी असलेले तलाव, पर्वत इत्यादी गोष्टी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.