अब्दुल कादिरना मारलेले सिक्स लक्षात राहिले, पण कसोटीतली ‘ती’ खेळी दुर्लक्षित; पहिल्या पाकिस्तान दौऱ्याबाबत सचिनने व्यक्त केली खंत

पहिल्या पाकिस्तान दौऱ्यात अब्दुल कादिर यांना मारलेले षटकार सर्वांच्या लक्षात आहेत, मात्र कसोटीतील महत्त्वाची ५७ धावांची खेळी दुर्लक्षित राहिल्याची खंत सचिनने व्यक्त केली.

Published On: 

Sachin Tendulkar talking about his first Pakistan tour

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकरच्या पहिल्या पाकिस्तान दौऱ्याची चर्चा निघाल्यावर बहुतांश वेळा त्याने अब्दुल कादिर यांना मारलेल्या सलग षटकारांचीच आठवण काढली जाते. मात्र, त्याच दौऱ्यात खेळलेली एक अत्यंत महत्त्वाची खेळी आजही दुर्लक्षित राहिल्याची खंत खुद्द सचिनने व्यक्त केली आहे.

एमसीएच्या शरद पवार क्रिकेट म्युझियममध्ये सचिनला समर्पित असलेल्या ‘बॅटोग्राफी’ या खास विभागाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सचिनने त्याच्या पदार्पणाच्या पाकिस्तान दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला. पेशावरमध्ये झालेल्या एका प्रदर्शनीय सामन्यात भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या होती. तेव्हा मुश्ताक अहमदला काही षटकार मारल्यानंतर, दिग्गज फिरकीपटू अब्दुल कादिर यांनी १६ वर्षीय सचिनला त्यांच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचे आव्हान दिले होते. सचिननेही हे आव्हान स्वीकारत कादिरला सलग षटकार ठोकले होते.

पेशावरमधील ती आक्रमक फलंदाजी चाहत्यांच्या कायम लक्षात राहिली. पण सचिनच्या मते, त्या दौऱ्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातील त्याची कामगिरी अधिक मौल्यवान होती. त्या सामन्यात भारताची अवस्था ४ बाद ३४ अशी बिकट झाली होती. त्यावेळी इम्रान खान, वसिम अक्रम, वकार युनूस आणि अब्दुल कादिर यांसारख्या घातक गोलंदाजांचा धैर्याने सामना करत सचिनने ५७ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली आणि भारताचा तो कसोटी सामना वाचवला.

आपल्या या खेळीबद्दल बोलताना सचिन म्हणाला, “आजही माझ्या करिअरमधील ती एक महत्वाची इनिंग आहे.” प्रदर्शनीय सामन्यातील फटकेबाजीला जेवढी प्रसिद्धी मिळाली, तितके महत्त्व कसोटीतील या संकटमोचक खेळीला दिले गेले नाही, याबाबत सचिनने आश्चर्य व्यक्त केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही