‘आम्ही तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल’; अजितदादा प्रकरणावरून प्रवीण दरेकरांचा रोहित पवारांना थेट इशारा

अजित पवार प्रकरणावरून आमदार प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली असून पोलिसांकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

Published On: 

BJP leader Pravin Darekar criticizes Rohit Pawar over political allegations

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात आणि मृत्यू प्रकरणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांना थेट इशारा दिला आहे. ‘उद्या आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल,’ अशा आक्रमक शब्दांत दरेकर यांनी रोहित पवारांना लक्ष्य केले आहे. रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असायला हवे, केवळ प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाण्याचे विरोधकांचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर येण्यासाठी पोलिसांनी रोहित पवार यांचीच चौकशी करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. यातून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल’, असे ते म्हणाले. रोहित पवारांच्या डोक्यात प्रसिद्धीचा हव्यास आणि मस्ती इतक्या लवकर जाईल असे वाटले नव्हते. संदर्भहीन बोलण्याची त्यांना सवय झाली असून, आरोप करायला अक्कल लागते, केवळ बोलायला काय लागते, असा टोला त्यांनी लगावला.

रोहित पवारांनी विमानाचा एक फोटो दाखवून केलेल्या आरोपांवरही दरेकर यांनी आक्षेप घेतला. संबंधित विमान कंपनी अनेकांना सेवा पुरवते, त्यामुळे केवळ एका फोटोवरून आरोप करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांचे नातू असूनही रोहित पवार आरोपांचा अतिरेक करून आपली राजकीय परंपरा मातीमोल करत असल्याची टीका त्यांनी केली.

अजितदादा हे राज्यातील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या मृत्यू प्रकरणात कोणताही संभ्रम राहू नये, पण आरोप करताना ठोस आधार हवा, अशी भूमिका दरेकर यांनी मांडली. जर रोहित पवारांना अजितदादांचा एवढाच कळवळा होता, तर त्यांनी पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला जायला हवे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र, याच कार्यक्रमाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे का उपस्थित नव्हते, याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) मुद्द्यावरूनही दरेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतील एका जबाबदार नेत्याने यावर भूमिका मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका मांडण्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भूमिका तपासावी. काँग्रेसच्या काळातही अशा प्रक्रिया झाल्या असल्याने त्यांनी स्वतःचा इतिहासही पाहावा, असा सल्ला दरेकर यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही