🕒 1 min read
Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. कालच वाल्मिक कराड (Walmik Karad), सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यावरून पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
अशातच आता यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी या आधीच स्पष्ट सांगितले आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्घृणपणे हत्या केली त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवून तातडीने फाशी द्यावी. त्यामुळे मला वाटत नाही कुणी काय म्हणावं, हा विषय वेगळा विषय आहे,” अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली आहे. (Dhananjay Munde on Santosh Deshmukh murder case)
आज बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा होत असून यावेळी मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Dhananjay Munde on Walmik Karad
दरम्यान, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या सर्वात जवळचा व्यक्ती समजला जातो. ज्या दिवशी या प्रकरणात त्याचे नाव आले त्या दिवशीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. परंतु अजूनही मुंडे यांनी राजीनामा दिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Deshmukh यांचा धक्कादायक दावा, म्हणाले; “घटनेदिवशीच बालाजी तांदळे…”
- खळबळजनक! “बीडचे जिल्हाधिकारी Walmik Karad चे फ्रंटमॅन म्हणून काम करतात?”
- Walmik Karad ला न्यायालयाचा पुन्हा मोठा दणका! सुनावली ‘इतक्या’ दिवसांची कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










