Walmik Karad । SIT कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालय कराडला जामीन देणार की आणखी कोठडीत वाढ करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
अशातच आता या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. बीड न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून यापूर्वी त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा (Macoca to Walmik Karad) दाखल करण्यात आला होता. त्यामुळे वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, जो आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो त्याला जामीन मिळणे सोपे असते. पण वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने सध्या त्याला जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.
Hearing on Walmik Karad Bail
तसेच कालच वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा आहे असे बोललं जात आहे. यामुळे देखील वाल्मिक कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :