Walmik Karad । खंडणी प्रकरणात सध्या अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड याच्याबाबत दररोज काही ना काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात तसेच इतर ठिकाणी करोडो रुपयांची संपत्ती असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. (Walmik Karad property)
साधा घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराडकडे इतकी संपत्ती कशी आली? असा सवाल अजूनही उपस्थित होत आहे. वाल्मिक कराड हा आयकर विभागाकडे वार्षिक लाखो रुपयांचा कर भरत असल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराड याची परदेशात संपत्ती असल्याचा संशय सीआयडीला असून याबाबत तपास सुरु आहे. वाल्मिक कराड आयकर विभागाकडे (Income Tax) दरवर्षी जवळपास 96 लाख रुपयांचा कर भरत होता, अशी माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
Walmik Karad Property Income Tax
ऊसतोड कामगाराचा मुलगा असणाऱ्या वाल्मिक कराडकडे आणखी किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची आज SIT कोठडी संपणार असून आज बीड कोर्टात त्याच्यावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आज वाल्मिक कराड याला जामीन मंजूर होणार की त्याच्या कोठडीत आणखी वाढ होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :